माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृती.
योजनेचे स्वरुप :
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्या त्या माध्यमिक शाळांमधील 5 वी ते 10 वी च्या् प्रत्येक ईयत्तेमधून पहिला व दुसरा असे प्रत्येकी दोन विद्यार्थी याप्रमाणे ही शिष्यवृत्ती दिली जाते.
  • नियम, अटी व पात्रता इ. :
  • विद्यार्थी हा मागासवर्गीय अनु. जाती, अनु.जमाती व विजाभज प्रवर्गातील असावा. 2) 50 % पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
  • इयत्ता 5 वी ते 7 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रतिमाह 50/- प्रमाणे 10 महिनेसाठी 500/- रुपये दिली जाते.
  • इयत्ता 8 वी ते 10 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रतिमाह 100/- प्रमाणे 10 महिनेसाठी 1000/- रुपये दिली जाते.