सर्व शिक्षा अभियान,शिक्षण विभाग(प्रा),ज़िल्हा परीषद लातूर
No Image Found

प्रस्तावना.

6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय राज्यघटनेच्या 86 व्या तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे. 1.1 दशलक्ष वसाहतींमधील 192 दशलक्ष मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची गरज भागवण्यासाठी राज्य शासनांच्या भागीदारीसह सर्व शिक्षा अभियान राबवले जात आहे.

शाळा नसलेल्या भागांमध्ये नव्या शाळा सुरु करणे आणि शाळा असतील त्या ठिकाणी अतिरिक्त वर्गखोल्या, प्रसाधनगृहे, पेयजल, देखभाल अनुदान आणि शाळेत सुधारणा घडवून आणण्यासाठी अनुदान प्राप्त करून देणे असे उपक्रम या कार्यक्रमांर्गत राबवले जातात.

 
सर्व शिक्षा अभियान
शिक्षण विभाग(प्रा),ज़िल्हा परीषद लातूर
विभागाचा दुरध्वनी क्रमांक
02382 248575

विभागाचा ईमेल

ssalatur@gmail.com
सर्व शिक्षा अभियान विभागामार्फत सन 2017/18 मध्ये राबविण्यात आलेल्या योजना खालीलप्रमाणे आहेत.सदरच्या योजनांची नावे

या कार्यक्रमांतर्गत पुढील उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

  • 1. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी एका निश्चित मुदतीची चौकट
  • 2. देशभरात दर्जेदार शिक्षणाच्या गरजेला प्रतिसाद
  • 3. मुलभूत शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्याची संधी

शालेय शिक्षण व्यवस्थापनात पंचायती राज संस्था, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण समिती, पालक-शिक्षक संघटना, माता-शिक्षक संघटना, जमातींच्या स्वायत्त परिषदा यांना प्रभावीरित्या सहभागी करून घेण्याचा एक प्रयत्न.

  • 4. उच्च स्तरावर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठीचे सक्रीय राजकीय पाऊल
  • 5. केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनामध्ये चांगली भागीदारी.
  • 6. ज़िल्हा / राज्यांना प्राथमिक शिक्षणासंदर्भात स्वतंत्र दृष्टी विकसीत करण्याची संधी

खालील तक्त्यावर एकदा नजर फिरवली असता सर्व शिक्षा अभियानाच्या प्रमाणात झालेली वाढ आणि केंद्र सरकारकडून राज्य शासनाला शिक्षण हक्क अनुदानापोटी मिळणारा निधी स्पष्ट होतो. सर्व शिक्षा अभियानाप्रती राज्य शासनाचे गांभीर्य तसेच सक्षम माहितीच्या आधारे तयार होणारा राज्याचा अर्थसंकल्प आणि त्यातील तरतूद पाहता, या दिशेने प्रामाणिकपणे प्रयत्न होत असल्याची खात्री पटते.

संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015