राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम
  • राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेची सुरुवात देशामध्ये सन 1982-83 पासून झालेली असून ही योजना केंद्र शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमामध्ये समाविष्ठ आहे.
  • योजनेची उद्दिष्टे :-
  • 1) स्वयंपाकासाठी व इतर घरगुती उपयोगासाठी बायोगॅस चा वापर करणे.
  • 2. ग्रामिण भागातील स्त्रीयांचे धुरापासून संरक्षण करणे व सरपणासाठी पडणाऱ्या कष्टापासून सुटका करणे.
  • 3. सरपणासाठी आवश्यक असलेली लाकुडतोड थांबवुन वनांचे संरक्षण करणे.
  • 4. बायोगॅस प्रकल्पा पासुन निर्माण होणाऱ्या शेणखतांचा वापर शेतीसाठी करुन रासायनिक खतांचा वापर कमी करणे
  • 5. शौचालयाची जोडणी बायोगॅस सयंत्रास करून गाव व परिसर स्वच्छ करणे.
  • 6. बायोगॅस चा वापर गॅस चलित इंजिन व रेफ्रिजरेटर मध्ये करुण डिझेल व पेट्रोलचा वापर कमी करणे
  • योजने अतर्गत लाभार्थीस मिळणारे अनुदान
  • 1) 1 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- रु. 5500/-
  • 2) 2 ते 6 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- रु. 9000/-
  • 3) बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडणी केल्यास जादाचे अनुदान :- रु.1200/-
  • 4) टर्न कि फी रक्कम प्रति सयंत्र रु. 1500/- एकूण प्रति सयंत्र अनुदान रु. 10,500/-
  • अनुदान मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • 1) गट विकास अधिकारी यांचे नावे विहीत नमुन्यात अर्ज.
  • 2) लाभार्थींच्या नावे शेतीचा 7/12 व 8 अ चा उतारा.
  • 3) लाभार्थी भूमिहीन शेतमजुर असल्यास तलाठयांचा दाखला
  • 4) लाभार्थ्याचा पुर्ण केलेल्या सयंत्रासह फोटो
  • 5) ग्रामसेवकांचा 5 ते 6 जनावरे असल्याचा दाखला लाभार्थीने सयंत्र स्वखर्चाने बांधुन पंचायत समितीमध्ये अर्ज दाखल करावा
  • बायोगॅस संबंधी सर्व साधारण संकीर्ण माहिती
  • 1) गोठयामध्ये बांधुन असणाऱ्या एका दुभात्या जनावरापासून 24 तासात सरासरी 10 ते 15 किलो शेण मिळु शकते व बाहेरुन चरुन येणाऱ्या जनावरापासून सरासरी 7 ते 10 किलेा शेण मिळू शकते तसेच लहान वासरापासून दिवसाला 2 ते 3 किलो शेण मिळू शकते .
  • 2) एक किलो शेणापासून सुमारे 40 लि. बायोगॅस निर्माण होतो तसेच 1 किलो खरकटे पासुन सुमारे 80 लि. गॅसची निर्मिती होते.
  • 3) एका व्यक्तीच्या दैनंदिन गरजेसाठी सुमारे 250 लि. बायोगॅसची आवश्यकता असते.
  • 4) एक घनमिटर बायोगॅस म्हणजे 1000 लि. गॅस
  • 5) पाच लिटरच्या डब्यामध्ये सर्वसाधारणपणे 18 ते 20 किलो शेण बसते.
• बायोगॅस सयंत्राचे प्रकार व मॉडेल
  • 1) गोबर/ के.व्ही.आय.सी. गॅस सयंत्र :- या प्लँन्टची बांधणी विहिरी प्रमाणे असते या प्रकारात लोखंडी टाकीचा वापर केला जातो मात्र लोखंडी टाकी 5 ते 10 वर्षात गंजून निकामी होत असल्याने सध्याच्या काळात या प्रकारचा गॅस प्लँन्टचा वापर कमी झाल्याचे दिसुन येते.
  • 2) वॉटर जॅकेट ( पाणकडयाचा ) गॅस प्लँन्ट :- या प्रकारच्या प्लँन्ट मध्ये लोख्‌ंडी टाकीच्या कडेने बांधकाम करुन जॅकेट तयार करुन त्यामध्ये पाणी भरलेले असते यामुळे या प्लँन्ट मध्ये गॅस गळती होत नाही. या प्लँन्ट मध्ये शेण अगर मैला पूर्णपणे टाकीच्या आतच राहतो त्यामुळे प्लँन्ट मधुन जास्तीत जास्त गॅस मिळतो. हा प्लँन्ट फक्त मैल्यावर चालवला तरी थोडी सुद्धा गहाण येत नाही . वॉटर जॅकेट मध्ये पाण्यात मधून मधून जळके तेल (वेस्ट ऑईल) टाकल्यास तेल लेाखंडी टाकीला लागुन टाकी गंजत नाही. 3) गणेश गॅस प्लँन्ट :- या प्रकारात लोखंडी टाकीचा वापर करण्यात येत असुन पाचक यंत्र व गॅस टाकी तयार मिळते. पाचक यंत्र लोखंडी पट्टया व बांबुच्या कामटयाचे बनवतात. लोखंडी पट्टया गंजून या प्रकारच्या प्लँन्टचे आयुष्य कमी होण्याचा संभव आहे.
  • 3)दिनबंधु गॅस सयंत्र - या प्रकारचे सयंत्र घुमटा आकार असून संपूर्ण सयंत्र जमीनी खाली असते. या सयंत्राचे बांधकाम विटा पासून किंवा आर.सी.सी. पद्धतीने करता येते. या प्रकारचे मॉडेल पूर्णपणे जमीनी खाली असल्याने अंगणात ही करता येते. या प्रकारच्या सयंत्रात इन लेट व आउट लेट मोठया आकाराचे असल्याने शेणा शिवाय इतर सडणारे व कुजणाऱ्या पदार्थाचा तसेच लहान मृत जनावरे (कुत्रे, मांजर, उंदीर,कोंबडी) या वापर करुन गॅस व खत मिळवता येते. प्लँन्टची खोली कमी व घुमटावर मातीचा भराव असल्यामुळे उबदारपण राहतो व गॅस निर्मिती जास्त होते. सध्याच्या काळात या प्लॅन्ट चा वापर जास्त होताना दिसुन येत आहे. 3 घ. मि. गॅस प्लॅन्ट बांधण्यासाठी आवश्यक मटेरिअल - खोदकाम मोजमापा प्रमाणे, सिमेंट 16 पोती, खडी (1/2” ¾”) 30 घ. फु. , विटा लहान साईज 1600 नग, वाळु 1.25 ब्रास व इतर आवश्यक मटेरिअल
  •  4)जनता गॅस प्लॅन्ट :- लोखंडा शिवाय हा प्लँन्ट बनत असल्याने दिर्घायुषी आहे. इनलेट व आउट लेट मोठया आकाराचे असल्याने शेणाशिवाय इतरही सडणारे व कुजणारे पदार्थ प्लँन्ट मध्ये टाकुन गॅस व खत निर्मिती करता येते.
  • 4) मलप्रभ्रा गॅस प्लॅन्ट :- मानवी मलाचा उपयोग करून गॅस निर्मिती या प्लॅन्ट द्वारे करण्यात येते. सार्वजनिक संडास, मोठया सोसायटयांमधील सेफ्टीक टँक ऐवजी या प्रकारचा गॅस प्लॅन्ट बांधल्यास सार्वजनिक ठिकाणी गॅस निर्मिती करुन तिचा वापर विज निर्मिती साठी करण्यात येवू शकतो. 1 घ. मि. गॅस प्लॅन्ट बांधण्यासाठी आवश्यक मटेरिअल - खोदकाम- 8'x 6’ 5’ सिमेंट 15 पोती, खडी (1/2" 3/4") 50 घ. फु. , विटा लहान साईज 2000 नग, दगड (8" 10") 1/2 ब्रास, रेती 1.5 ब्रास व इतर आवश्यक मटेरिअल
  • 5) प्रि फॅब्रीकेटेड FRP Biogas Plant: - या प्रकारच्या सयंत्रामध्ये तयार टाकी असते. ही टाकी जमिनीच्या वर असते. या प्रकारचे मॉडेल पुर्णत: खडकाळ जमीन खोदणे शक्य नसेल त्या जागी तसेच काळी जमीन असलेल्या भागात जास्त उपयोगी पडते. कारण काळया जमीनीत इतर सयंत्रांना तडे जाण्याची शक्यता अधिक असते. ती अडचण या प्रकारच्या मॉडेलमध्ये येत नाही. या प्रकारच्या सयंत्रात इनलेट व आऊटलेट हे टाकीच्या दोन्ही बाजूला असतात. यामध्ये शेण, खरकटे व इतर लवकर कुजणारे पदार्थ वापरता येतात. सयंत्रे तातडीने उभी करणे गरजेचे असल्यास याप्रकारची सयंत्रे वापरण्यात येतात. अशा प्रकारचे मॉडेल खालील संस्थांमार्फत बसविणेत येतात.
राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम सन 2014 - 2015 जिल्हयात उभारण्यात आलेली तालूकानिहाय सयंत्र संख्या.
अ.क्र. तालूका सयंत्र संख्या
  1 लातूर   12
  2 औसा   11
3 निलंगा 10
4 उदगीर 09
5 अहमदपूर 17
6 चाकूर 07
7 रेणापूर 07
8 शिरूर अनंतपाळ 03
9 देवणी 08
10 जळकोट 12
एकुण 96
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015